नवी दिल्ली | WhatsApp, Facebook, Instagram सह अनेक अॅप्स असे आहेत जे एकदम फ्री व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग उपलब्ध करून देतात. परंतु, ही सुविधा लवकरच बंद होणार आहे. ही सुविधा अशावेळी बंद होत आहे. ज्यावेळी ट्रायकडून प्रस्ताव लागू केला जाणार आहे. एका रिपोर्टनुसार, दूरसंचार विभाग (DoT) ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने इंटरनेट आधारित कॉलला रेग्युलेट केल्यानंतर प्रस्ताववर विचार व्यक्त करण्यास सांगितले आहे. जर असे झाले तर मोठी अडचण निर्माण होवू शकते. याआधी ट्रायने सुरुवातीला या प्रस्तावला २००८ मध्ये मागे घेतले होते. डॉटने आता या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी DoT ने TRAI ला विचार व्यक्त करण्यास सांगितले आहे.
ट्रायच्या ओरिजनल सिफारशीला २००८ मध्ये परत घेतले होते. यावरून म्हटले होते की, इंटरनेट सेवा देणारी टेलिफोन नेटवर्क वर इंटरनेट कॉल उपलब्ध करण्याीच परवानगी दिली जावू शकते. परंतु, यासाटी इंटरकनेक्शन शुल्क घेतले जाईल. सोबत वैलिड इंटरसेप्शन इक्यूप्मेंट ला इंस्टॉल करावे लागेल. अनेक सुरक्षा एजन्सीचे पालन करावे लागेल. या मुद्द्याला २०१६ ते १७ मध्ये पुन्हा एकदा उठवले होते. ज्यावेळी नेट न्यूट्रॅलिटीची चर्जा केली जात होती. परंतु, दूरसंचार विभाग आता या प्रस्तावावर चर्चा करीत आहे.
टेलिकॉम ऑपरेटर खूप आधी पासून सर्व इंटरनेट आधारित कॉलिंग आणि मेसेजिंग सर्विसेजसाठी एक सारखा कायदा बनवण्याची मागणी करीत आहे. सोबत रिपोर्टमध्ये म्हटले की, लायसन्स फी समान रूपाने केली जावी. सोबत क्वॉलिटी ऑफ सर्विस सुद्धा एकसारखी असायला हवी. जर असे झाले तर Google Duo, WhatsApp, Instagram, Facebook Messenger, Signal, Telegram सह अन्य अॅप्सवरून केली जाणाऱ्या कॉल्सवर चार्ज यूजर्सकडून घेतले जावू शकते. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की, या सर्विसेज टॅरिफ आणि शुल्क किती लागू केले जाईल किंवा ग्राहकांकडून किती पैसे घेतले जातील, हे लवकरच समजू शकणार आहे.