नवी दिल्ली | जी-मेल (Gmail) चा वापर अनेकजण करतात. कधी ई-मेल पाठवण्यासाठी तर कधी ई-मेल मिळवण्यासाठी याचा वापर होतो. आपण Gmail अनेक ठिकाणी Log-in करतो पण तो कुठं-कुठं Log-in आहे हे नंतर आठवत नाही. मग कधी याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. पण आपला Gmail कुठं Log-in आहे हे आता समजू शकणार आहे.
सर्वात आधी आपण गुगल अकाउंटवर जाऊन Review करावा आणि यामध्ये किती डिव्हाईसशी जीमेल Access केला आहे हे पाहावे. त्यासाठी गुगल अकाउंटवर जाऊन नेव्हिगेशन पॅनलमधून सिक्युरिटी पॅनलमध्ये जावे. सिक्युरिटी पॅनलमध्ये Manage Device चा पर्याय मिळेल. तिथं क्लिक केल्यावर तुम्हाला आता किती डिव्हाईसशी जीमेल Log-in आहे दिसेल…अधिक माहितीसाठी लिस्टच्या डिव्हाईसला सिलेक्ट करावे.
त्यानंतर एक लिस्ट येईल आणि त्यामध्ये तुम्ही कुठं-कुठं Log-in केलं हे दिसून येईल. जर तुम्ही ऍक्सेस न केलेले डिव्हाईस तिथं दिसत असेल तर समजून जा की तुमचा Gmail कोणीतरी Access करत आहे. पण जर तुम्हाला समजले की आपण हा Gmail तिथून वापरला नाही तेव्हा तुम्ही Sign-Out ही करू शकता.