नवी दिल्ली | YouTube Channels Block : केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक केला असून यावेळी 8 YouTube चॅनेल्स Block केली आहेत. यामध्ये पाकिस्तानी चॅनलचाही समावेश आहे. देशविरोधी बनावट आणि चुकीचे चुकीचे वृत्त (Fake News) पसरविणाऱ्या युटुब चॅनल्सना जोरदार दणका देताना केंद्र सरकारने ती बंद केली आहेत.
देशाची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याबद्दल केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आठ युटुब चॅनल्स ब्लॉक केली आहेत. यामध्ये सात भारतीय तर, एक पाकिस्तानी चॅनल आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीचे वृत्त (Fake News) प्रसारीत करण्यासाठी या 8 YouTube चॅनेलचा वापर केला गेला. त्यामुळे ही चॅनल्स ब्लॉक केली आहेत. IT नियम, 2021 अंतर्गत 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान स्थित YouTube न्यूज चॅनल ब्लॉक केले आहे.
भारताला बदनाम करणाऱ्या या YouTube चॅनलला 114 कोटी लोकांनी पाहिले आहे. तर, 85 लाख 73 हजार इतके त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत.