अनेकदा आपण ट्विट केल्यानंतर काही वेळानंतर चूक झाल्याचे लक्षात येते परंतु एडिटचा पर्याय नसल्याने ते ट्विट डिलिट करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. आता याच अडचणीची दखल ट्विटरने घतली असून लवकरच आपल्याला ट्वrट एडिट करण्याचा पर्याय मिळणार आहे. ट्विटर युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.
दरम्यान सुरुवातीला ही सुविधा ट्विटर व्हेरीफाईड अकाउंट असणाऱ्यांना मिळणार आहे. ट्वीट एडिट करण्याची मागणी अनेक दिवसापासून होती. टेस्लाचे CEO यांनी देखील ट्वीट करत ही मागणी केली होती. अखेर ट्विटरने हा पर्याय युजर्सला देण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्वीट केल्यानंतर यूजर्सला अर्ध्या तासापर्यंत ट्वीट एडिट करता येणार आहे. सध्या ट्विटरने याची टेस्टिंग सुरू केली आहे. ट्विटरने ट्वीट करत सांगितले आहे की, जर तुम्ही ट्वीट केल्यानंतर तुम्हाला एडिटचा पर्याय दिसत असेल तर हे टेस्टिंगमुळे हा पर्याय दिसच आहे. सुरूवातीला ही सुविधा फक्त व्हेरिफाईट अकाउंट असणाऱ्या युजर्सला मिळणार आहे.
या नव्या पर्यायामुळे तुम्हाला ट्वीट बदलता येणार आहे पण यामध्ये एक छोटा ट्विस्ट आहे. तुम्हाला ट्वीट एडिट करायचा पर्याय मिळेल पण तुम्हाला तुमच्या ट्वीटची संपूर्ण हिस्ट्री पाहयला मिळेल. म्हणजे तुम्ही केलेल्या पहिल्या ट्विटपासून ते तुम्ही बदलेल्या ट्विटपर्यंत. भारतात ही सुविधा कधीपासून येणार याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण व्हेरिफाईट ट्विटर अकाउंट असणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे ट्वीट कोणी पाहिले हे देखील तुम्हाला समजणार आहे.