दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे पहिली सुनावणी झाली. यादरम्यान, दोन्ही पक्षाकडून अत्यंत आक्रमक युक्तिवाद करण्यात आला. मात्र, या १० मिनिटांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश देत निवडणूक आयोगाने शिवेसनेच्या पक्षचिन्हासंदर्भात येत्या २७ सप्टेंबरपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये, असं सांगितलं. तसेच, न्यायालयाने यासंदर्भातील पुढील सुनावणी ही २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
सर्वोच्च न्यायायलयात सत्तासंघर्षावर काय निर्णय होणार याकडे शिंदे आणि उद्धव ठाकरे गटासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. मात्र, आता ही सुनावणी तब्बल २० दिवस पुढे गेल्याने निर्णयासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. निवडणूक आयोगासंदर्भातील ही सुनावणी पुढे ढकलल्याने एकप्रकारे हा शिंदे गटाला धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ५ न्यायमूर्तींचं घटनापीठ गठित करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वाखालील घटनापीठ या प्रकरणाचा निर्णय घेतील. या या घटनापीठे पुढे यासंदर्भातील पहिली सुनावणी होती. मात्र, सुनावणी सुरु होताच खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी ही २७ सप्टेंबरला होणार आहे.