अमरावती | अमरावतीतील कथित लव्ह जिहार प्रकरणावरून शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीच अपहरण झाल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी यांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसोबत सोबत हुज्जत घालून राडा केला होता.
पोलिसांना अपमानास्पद वागणूक खासदार नवनीत राना यांनी दिली. तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे आज राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
पोलिसांचा एवढाच राग राग करताय ना, मग तुम्ही खासदार आहात, केंद्रात तुमचे सरकार आहे, मग पोलिसांची सुरक्षा काढून टाका, कशाला पोलिसांची सुरक्षा घेता?’ असा सवाल करत पोलिसांच्या कुटुंबीयांना खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात निदर्शनं केली.
यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.