नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. लोकांना हे जाणून घेण्यात खूप कुतुहल असतं की पीएम मोदींकडे काय-काय आहे? त्यांचे घर कुठे आहे, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, त्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे का? तर नुकतंच पंतप्रधान कार्यालयाने याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2.23 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचे मालक आहेत. पीएमओ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, मोदींनी दिलेल्या संपत्तीत वर्षभरात २६ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
गांधीनगर जमीन दान केली
पीएमओच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांच्या बँक खात्यामध्ये 2.23 कोटी रुपये जमा आहेत. पीएम मोदींच्या संपत्तीशी संबंधित ताज्या माहितीनुसार त्यांच्याकडे कोणतीही अचल संपत्ती नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या वाट्याची जमीन दान केली होती.
2002 मध्ये निवासी जमीन खरेदी केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. यात तो तिसरा सहभागी होता. ताज्या माहितीनुसार, रिअल इस्टेट सर्व्हे नंबर 401/ए वर त्यांच्याकडे मालकी हक्क नाही. कारण, त्यांनी त्यांच्या वाट्याची जमीन दान केली होती.
मोदींकडे फक्त 35,250 रुपये रोख
31 मार्च 2022 पर्यंत पंतप्रधान मोदींकडे एकूण रोख फक्त 35,250 रुपये आहे. याशिवाय, पोस्ट ऑफिसमध्ये 9, 05, 105 रुपयांची नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफेकेट्स (NSC) आहेत. तर, त्यांच्याकडे 1, 89, 305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) आहे.