मुंबई | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास काय कराल असा सवाल राज्य सरकारला शरद पवार यांनी केला आहे.