मुंबई | मंत्रालयातील आयटी विभागाच्या सचिवांना मारहाण केल्याप्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत सापडले होते. मात्र, कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने दिलासा मिळाला आहे. सचिवांना मारहाण प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये क़डू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील आठवड्यात गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना अटक करून 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. परंतु, कडू यांना सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा देत आज जामीन मंजूर केला आहे.