मुंबई | नितेश राणे उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असं कॅप्शन देत व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.
व्यासपीठावर खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळं व्यासपीठानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं .तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधाला आहे. रिकाम्या खुर्चीवरून संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘उद्या तुमचीही खुर्ची खाली असेल तयारी ठेवा’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
गिधाडांना लचका तोडू देऊ नका, असं शिवसेनेच्या गटनेत्यांना आवाहन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नेस्को सभागृहात काल शिवसेनेचा मेळाव्यात ते बोलत होते.उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजच सांगतो. एक लक्षात घ्या मृत्यूमध्ये फरक कसा असतो. मी गिधाड हा शब्द का वापरला हे लक्षात घ्या. कारण मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाड कुठे असतात? मुंबई ही तुमच्यासाठी केवळ विकण्यासाठी स्वेअर फुटाची जमीन असेल पण आमच्यासाठी ही मातृभूमी आहे.