नवी दिल्ली | राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी देशातील जवळ जवळ 12 राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विविध ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात 100 हून अधिक जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे छापे दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आलेल्या आर्थिक मदतीप्रकरणी असल्याचे समजते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. ज्या PFI संघटनेवर ही कारवाई करण्यात आली ती आहे तरी काय, कधी स्थापन झाली, त्यांचे काम काय आणि त्यांच्यावर काय आरोप केले जातात समजून घ्या…
काय आहे PFI ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक कट्टर इस्लामीक संघटना आहे. मागास आणि अल्पसंख्यांकाच्या अधिकारासाठी काम करणारी संस्था अशी स्वत:ची ओळख ते सांगता. पण देशात झालेल्या अनेक दंगलीच्या मागे या संघटनेचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या संघटनेबद्दल असे बोलले जात आहे की त्यांचे केरळ मॉड्यूल दहशतवादी संघटना ISISसाठी काम करते. केरळमधून या संघटनेच्या सदस्यांनी सिरिया आणि इराकमधील ISISमध्ये सामील झाले होते.
कशी होते भरती ?
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, पीएफआय देशातील 23 राज्यात सक्रीय आहे. या संघटनेने दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम भागात नेटवर्क उभे केले आहे. संघटनेचे कार्यकर्ते मुस्लिम युवकांचे ब्रेनवॉश करतात. तेलंगणा पोलिसांच्या कोर्ट डायरीनुसार पीएफआय मदत निधी गोळा करून मुस्लिम युवकांना असामाजिक कामासाठी प्रशिक्षण देते.
काय काम करते ?
रिपोर्ट्सच्या नुसार, पीएफआयचा हेतु अतिशय धोकादायक आहे. सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली परदेशातून निधी गोळा करणे आणि दहशतवादी मॉड्यूल तयार करणे, भारताविरुद्ध प्रचार करने, शाळा-कॉलेजमधून नव्या तरुणांची भरती करणे, मुलांचे ब्रेनवॉश करमे, तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, दगड फेकण्याचे प्रशिक्षण देणे, शांततेत सुरु असलेल्या मोर्चाला हिंसक करणे अशी कामे केली जातात.