मुंबई | अनिल परब यांच्या दापोलीमधील कथित वादग्रस्त रिसॉर्टबाबत खुद्द परब यांनी नव्यानं भाष्य केलं आहे. सोमय्या वारंवार माझी आणि उद्धव ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सोमय्यांना याप्रकरणी माफी मागावी लागेल किंवा कारवाईला सामोर जावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
परब म्हणाले, “दापोलीच्या रिसॉर्टबाबती मी वारंवार सांगितलं आहे. त्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. याबाबत ईडीकडून, स्थानिक प्राधिकरणाकडून चौकशी झाली आहे. याबाबत स्थानिक प्राधिकरण आणि कोर्टाच्या आदेशाला आम्ही बंधनकारक आहोत. किरीट सोमय्या काय म्हणले याला आम्ही बांधील नाही. ज्या यंत्रणांना अधिकार आहे ते जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन आम्ही करु”