पुणे | वायनरी, दारूवरील टॅक्स कमी करण्यासाठी आग्रही असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना वेदांत प्रकल्पबाबत बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
केंद्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ व हरीत जलसमृद्ध गाव याविषयावरील कार्यशाळेच्या निमित्ताने महाजन आले होते. पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, ‘‘वेदांत आमच्या काळात नाही गेली. पाच जानेवारीला सरकारला पत्र दिले होते. सहा महिने काहीही केले नाही. बैठकही घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला टीकेचा अधिकार नाही. याबाबत महाविकास आघाडीने टीका न करता आत्मपरिक्षण करावे.’’