मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,65,395 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 550 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. पाहूयात मागील आठ दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी –
22 सप्टेंबर (गुरुवार) –
550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तीन जणांचा मृत्यू
21 सप्टेंबर (बुधवार) –
640 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
पाच जणांचा मृत्यू
20 सप्टेंबर (मंगळवार) –
550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दोन जणांचा मृत्यू
19 सप्टेंबर (सोमवार) –
292 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दोन जणांचा मृत्यू
18 सप्टेंबर (रविवार) –
602 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तीन जणांचा मृत्यू
17 सप्टेंबर (शनिवार) –
631 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तीन जणांचा मृत्यू
16 सप्टेंबर (शुक्रवार) –
697 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
15 सप्टेंबर (गुरुवार) –
755 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण –
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या तीन हजार 857 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णाचे प्रमाण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहे. मुंबईमध्ये सध्या 805 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात एक हजार 1194 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यामध्ये 511 सक्रीय रुग्ण आहेत. त्याशइवाय रायगड 214, नाशिक 124 आणि नागपूरमध्ये 147 सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी 100 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. परभणीमध्ये सर्वात कमी दोन सक्रिय रुग्ण आहेत.