पुणे | लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वा जयंती उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आराध्य गोडसे व राज ठाकूर या विद्यार्थ्यांनी कर्मवीरांची वेशभूषा साकारली होती. अभिजीत शिंदे, मयुरी जगदाळे, श्रावणी वाघमारे, रिया देशमुख या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर, अनुष्का ठाकूर या विद्यार्थिनीने कविता सादर केली. याप्रसंगी इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी रयत गीत सादर केले.
यावेळी लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य डेनसिंग, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शोफेमॉन, पर्यवेक्षिका मनिषा तिरखुंडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्री शिवले, प्रास्ताविक नितीन बटुळे, छायाचित्रण शुभम कांबळे व चैत्राली जगताप यांनी केले तर जयश्री झरे यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी पर्यवेक्षक सुरेश पाटील, पर्यवेक्षिका पल्लवी ठाकरे, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.