पुणे | पुण्यातील निगडी येथील गंगानगर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंगानगर परिसरात राहत असलेल्या एका तरूणीवर तीन-चार तरूणांनी क्रुर पध्दतीने अत्याचार केला आहे. या नराधमांनी तरूणीच्या अंगावर दारू ओतली आणि त्यानंतर तरूणीच्या तोंडात मिर्ची पावडल टाकली नंतर या तरूणीच्या शरीरावर आणि गुप्त अंगावर दारू ओतून ब्लेडने वार केले आहेत. याविरोधात पीडित तरूणीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ही घटना दि. 22 रोजी घडली आहे. पिडीत तरूणी रस्त्यावरून जात होती. ती कणीस घेण्यासाठी एका ठिकाणी उभा राहिली. यावेळी काही तरूण तिथे आले, त्यांच्या हातात कोयते होते, त्यातील एक आरोपी म्हणाला हिला पकडा (पिडीतेला) हे ऐकून पिडीत तरूणीने तेथून पळ काढला. धावत असताना ती जवळ असलेल्या पांढरकर सभागृहाच्या मागील गुरुदेवनगर येथील सार्वजनिक शौचालयामध्ये लपून बसली. मात्र आरोपींनी तिला शोधले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची पिडीतेच्या बहिणीने निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरून एकाला अटक केली आहे, तर बाकी आरोपींचा शोध निगडी पोलिस करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पाहिला मिळत आहे.