उत्तर प्रदेश | अनेकदा लोकसभा आणि राज्यसभेतील राजकाऱ्यांचे विविध अनेक व्हिडिओ समोर येत असतात. त्यावर चर्चादेखील होत असते. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने वातावरण तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. कारणही तसचं असून, सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, व्हिडिओमधील कृतीवरून भाजपच्या आमदारांकडे वेळंच वेळ असल्याची टीका होऊ लागली आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असून, सपाने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये विधानसभेत सभागृहाच्या कामकाजादरम्यान भाजपचे एक आमदार तंबाखूचे सेवन करताना दिसून येत आहे. तर, दुसरे महाशय मोबाईल फोनवर गेम खेळण्यात व्यस्त आहेत. भाजप आमदारांच्या या कृत्याचा व्हिडिओ समाजवादी पक्षाने व्हायरल करत सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
विधानसभेला अशा लोकांनी मनोरंजनाचे ठिकाण बनवल्याची टीका सपाने हा व्हिडिओ ट्वीट करताना केली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महोबाचे भाजप आमदार मोबाईल गेम खेळत आहेत. तर, झांशीचे भाजप आमदार तंबाखू खाताना दिसून येत आहे. या लोकांकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नसतात आणि सभागृहाला यांनी मनोरंजनाचे ठिकाण बनवले आहे ही अतिशय निंदनीय आणि लज्जास्पद बाब असल्याचं सपाने म्हटले आहे.
दरम्यान, व्हयरल होणारे हे व्हिडिओ 22 सप्टेंबर 2022 चे असल्याचे सांगितले जात आहेत. या दिवशी सभागृहाचे कामकाज महिला सदस्यांना समर्पित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री योगींनी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले होते.