पुणे | माँ आशापुरा माता मंदिर नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ झाला. पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सपत्नीक पूजा व घटस्थापना झाली. आजपासून पुढील नऊ दिवस हा नवरात्र उत्सव असून यामध्ये अभिषेक, नवचंडी महायज्ञ, श्रीसुक्त पाठ, भजन, माता की चौकी हे विधी व कार्यक्रम होणार आहेत.
ADVERTISEMENT
घटस्थापना व पूजेप्रसंगी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, दिलीप मुनोत, अरुण शिंघवी, परेश शिंघवी, विशाल शिंघवी, लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे श्याम खंडेलवाल, अध्यक्ष राजीव अगरवाल, मंगेश कटारिया, अशोक भंडारी, अनिल गेलडा, राजेंद्र गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था, त्यांची सुरक्षा, वाहतूक व पार्किंग, प्रसाद, अभिषेक व महायज्ञ यासाठीचे सर्व नियोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.