मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. 60 ते 70 च्या दशकात आशा पारेख या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी राजेश खन्ना, विनोद खन्ना यांच्यासह अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. त्या काळात आशा पारेख या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्ध होत्या.
आशा पारेख यांनी तिसरी मंझिल, दिल देके देखो, कटी पतंग, प्यार का मौसम, मेरा गाव-मेरा देश, कारवाँ असे अनेक एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमा आशा पारेख यांनी केले आहेत. राजेश खन्ना, शम्मी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा अनेक बड्या स्टार्ससोबत आशा पारेख यांनी काम केलं आहे. तसंच फक्त हिंदी नाही तर गुजराती, पंजाबी, कन्नड सिनेमांमधूनही त्यांनी काम केलं आहे.