मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी अशा शिवभोजन थाळीला शिंदे सरकार स्थगिती देणार अशी चर्चाा होती. मात्र, शिवसेनेची शिवभोजन थाळी सुरूच राहणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय शिंदे सरकारन घेतला आहे. शिंदे सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. शिवभोजन थाळी संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मात्र प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री हे शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी सुरू केली होती.
दोन दिवसांपूर्वीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा खात्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतला. सध्या राज्यात 1 लाख 80 हजार शिवभोजन थाळ्यांसाठी परवानगी आहे. त्यातील 1 लाख 40 हजार थाळ्या दिवसाला खाल्या जातात. मागील सरकारने 2 लाख प्लेट करण्यात याव्या असं प्रस्ताव होता. पण, आता शिवभोजन थाळी किती लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याचा खर्च किती होत आहे, याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.