प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू (ओमप्रकाश बाबूराव कडू) यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. यंदा ते पुन्हा चर्चेत आलं आहे एका व्हिडीओ मुळे. या व्हिडीओमध्ये बच्चू कडू एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.
अमरावती अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याच पक्षातल्या एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमरावतीच्या गनोजा गावात रस्त्याच्या उद्घाटनावेळी स्थानिक नागरिकानं कामासंदर्भात प्रश्न विचारला मात्र त्यावेळी बोलताना मध्ये बोलणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी कानशिलात लगावल्याचा आरोप होतो आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू एका व्यक्तिच्या कानशीलात लगावताना दिसत आहेत. बच्चू कडू यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमात राग अनावर झाल्यानं कार्यकर्त्याच्या कानशीलात लगावल्याचा आरोप केला जात आहे.
अमरावतीच्या गनोजा गावात अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. अमरावतीतील गनोजा गावातील रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात एका स्थानिक नागरिकानं बच्चू कडूंना प्रश्न विचारला. त्यावेळी बच्चू कडू त्या स्थानिकाच्या प्रश्नाला उत्तर देत होते. तेवढ्यात त्यांचा एक कार्यकर्ता मध्येच बोलला. त्यावेळी बोलणं तोडल्यानं बच्चू कडूंना राग अनावर झाला आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या कानशीलात लगावली, असा आरोप सध्या होत आहे.