नाशिक | नाशिकमधील स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शिंदेंनी उपस्थितांकडून मराठीत बोलण्याची परवानगी मागितली. ‘मराठीत चालेल ना?’ असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं आणि उपस्थितांनीही मराठीत बोलण्याची परवानगी दिली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये मिश्र भाषण केले.
एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सुरुवात अशी झाली…
भारी संख्या मे सभी भाईयो और बहनो, मै आप सभी लोगो को बहौत बहौत शुभकामनाये देता हू, बधाई देता हू, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावल झालेली ही नाशिक नगरी… इसे मंत्र नगरी भी कहते है, आणि या शहरामध्ये आज स्वामीनारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. मराठीत चालेला ना थोडं… महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या स्वागत आहे. बाहर से भी लोग आये है.. विदेश से भी आये है.. सभी लोगो का मै तह दिल से स्वागत करता हू, सभी लोगो का अभिनंदन करता हू, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.