पुणे | उद्योग, व्यापारसह सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत नावारुपाला आलेल्या जीतो संघटनेच्या ‘जीतो पुणे चॅप्टर’च्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदी सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख प्रसिद्ध उद्योजक राजेशकुमार सांकला यांची तर, मुख्य सचिवपदी बी जे भंडारी ग्रुपचे संचालक चेतन भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. ही नवीन कार्यकारिणी २०२२-२४ या कालावधीसाठी असणार आहे.
या नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा उद्या मंगळवारी (१८ ऑक्टोबर) कोरियंथन क्लब येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या शपथग्रहण सोहळ्यात २१ बोर्ड ऑफ डायरेक्टर शपथ ग्रहण करणार आहेत. या कार्यक्रमाला ‘जीतो अॅपेक्स’चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ‘जीतो पुणे चॅप्टर’च्या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून राजेशकुमार सांकला, उपाध्यक्षपदी मनोज छाजेड, अशोक हिंगड, सुदर्शन बाफना, विनोद मांडोत, नरेंद्र छाजेड, मुख्य सचिव चेतन भंडारी, सचिव दिनेश ओसवाल, सह सचिव संजय डागा, खजिनदार किशोर ओसवाल तर, सहखजिनदार दिलीप जैन असणार आहेत.
‘जीतो’ संस्था जैन समाजातील चारही पंथांना एकत्रित आणणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. सेवा, शिक्षण आणि आर्थिक सशक्तीकरण हे जीतो संस्थेचे ब्रीद आहे. त्यानुसार ही संस्था काम करते. देशभरात जीतोचे ६४ चॅप्टर असून परदेशात ११ चॅप्टर आहेत. दर दोन वर्षांनी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येऊन संस्थेला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी कार्य करते.
मंगळवारी होणाऱ्या शपथग्रहण सोहळ्यास सल्लागार समितीमधील देवीचंद जैन, विजयकांत कोठारी, अॅड. एस. के. जैन, अचल जैन, विजय भंडारी, कांतिलाल ओसवाल, ओमप्रकाश रांका, रविंद्र सांकला, नरेंद्र छाजेड, अजय मेहता, पंकज कर्णावट तर, ‘अॅपेक्स समिती’मधील संगीता ललवाणी, धीरज छाजेड, राजेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जीतो पुणे च्या आयटी, पीआर व मीडिया विभागाचे प्रमुख संतोष जैन यांनी दिली.