- कलकत्तावरुन भुयारी मेट्राे मार्गावरील काेच पुण्यात दाखल
पुणे | पुण्यातील सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने मेट्राे प्रकल्प महत्वपूर्ण मानला जात अाहे. पुणे शहरातील काेथरुड ते गरवारे अाणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते फुगेवाडी यादरम्यानचे मेट्राे मार्ग सुरु झाले अाहे. सदर दाेन्ही मेट्राे रेल्वे मार्ग एकमेकांना जाेडण्याच्या दिशेने महामेट्राे वेगाने काम करत असून कलकत्ता येथुन भुयारी मेट्राे मार्गावर धावणारी रेंजहिल डेपाेतील पहिला मेट्राे काेच रेंजहिल स्टेशन येथे गुरुवाारी दाखल झाला अाहे.त्यामुळे लवकरच भुयारी मेट्राेची प्रायाेगिक तत्वावर चाचणी करुन संबंधित दाेन्ही मेट्राे मार्ग एकमेकास ३१ अाॅक्टाेबर पर्यंत जाेडून २५ किलाेमीटर अंतराचे मेट्राे जाळे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महामेट्राचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित व जनसंर्पक अधिकारी हेमंत साेनवणे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.
दिक्षित म्हणाले, स्वातंत्र्याच्या अाझादी महाेत्सव निमित्त काेथरुड ते गरवारे मेट्राे मार्गावरील मेट्राेचा विस्तार हाेण्याच्या दृष्टीने गरवारे ते डेक्कन यादरम्यान मेट्राेची यशस्वी चाचणी घेण्यात अाली अाहे. अशाचप्रकारे फुगेवाडी ते दापाेडी या स्थानाका दरम्यान मेट्राे चाचपणी पूर्ण झाली अाहे. दाेन्ही मार्ग जाेडण्याच्या दृेष्टीने शिवाजीनगर व सिव्हील काेर्ट ही भूमिगत मेट्राे स्थानक महत्वपूर्ण असून त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरु झाले अाहे.सातवा रेल्वे काेच पुण्यात दाखल झाल्याने अागामी काळात जलद गतीने मेट्राे सेवा कार्यरत हाेईल. शिवाजीनगर परिसरात रेंजहिल्स परिसरात मेट्राेतर्फे ‘अाॅपरेशनल कंट्राेल सिस्टीम’ चे काम पूर्ण झाले अाहे. याद्वारे ३३ किलाेमीटर अंतराचे मेट्राे स्टेशनवरील नियंत्रण व देखरेख ठेवण्यात येईल. सीसीटीव्ही निगराणी, सिग्नल पाहणी, स्टेशन अाॅपरेटरशी संवाद, कुठे अडचण उदभवल्यास त्याचे निराकरण अादी गाेष्टी यामाध्यमातून करण्यात येणार अाहे. पुण्यातील मुठा नदीचा परिसरातील मेट्राे लगतचा परिसर हरित करण्यासाठी वेगवेगळया ६९ प्रकारची झाडे लावण्यात येणार अाहे.
दुसऱ्या टप्प्यातील मेट्राे विस्ताराचा प्रस्ताव
पुण्यात सध्या दाेन मार्गावर मेट्राे धावत असून ती साधारण ११ किलाेमीटर अाहे. मात्र, पूर्ण मेट्राे सेवा कार्यान्वित झाल्याशिवाय पुरेसे नियमित प्रवाशी उपलब्ध हाेणार नसल्याने मेट्राेचा सध्याचा खर्च ताेटयात असूनही ती चालविण्यात येत अाहे. नेमका मेट्राेचा अाॅपरेशनल खर्च किती येत अाहे? याबाबतची माहिती अद्याप मेट्राेने दिलेली नाही. पूर्ण क्षमतेने मेट्राे लवकरात लवकर कार्यरत करणे याकरिता अाम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, मेट्राेचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार करण्यासाठी वनाझ ते चांदणी चाैक हा दीड किलाेमीटरचा मेट्राे मार्ग अाणि रामवाडी ते वाघाेली हा १२ किलाेमीटर अंतराचा मेट्राे मार्ग असा एकूण ३५०० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेला प्रस्ताव शासनाला पाठविण्यात अाल्याची माहिती मेट्राेच्या वतीने देण्यात अाली अाहे.