रायगडमध्ये राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. (RCF) कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींवर आरसीएफ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील थळ येथील प्लँटमध्ये ही दुर्घटना झाली आहे. GTG स्टिम जनरेशन प्लँटमध्ये स्फोट झाल्याचं समोर येत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे हे दाखल घटनास्थळी दाखल झाले आहेत.