विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे होणार परिषद
पुणे | एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन यांच्या तर्फे १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय चौथी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती सभागृह, विश्वराजबाग, लोणी काळभोर आयोजित केली जाणार आहे. संवाद, सर्वसमावेशकता आणि शांतता या तीन विषयावर ही परिषद असणार आहे. मुंबई प्रेस क्लब, आर. के. लक्ष्मण म्युझियम पुणे, फॉरैन करस्पाँडंट क्लब ऑफ साउथ एशिया, नवी दिल्ली आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या सहयोगाने ही परिषद होणार आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे. या समारंभासाठी एएनआयच्या संपादिका स्मिता प्रकाश, खासदार जवाहर सरकार, आर. के. लक्ष्मण म्युझियमच्या संचालिका उषा लक्ष्मण, आयसीएचआरचे अध्यक्ष पद्मश्री राघवेन्द्र तन्वर, न्यूज २४ च्या संपादिका अनुराधा प्रसाद, द डेली मिलापचे वरिष्ठ संपादक ऋषी सुरी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, प्राची कुलकर्णी आणि प्रा. प्रियंकर उपाध्ये यांची अतिथी म्हणून सन्मानीय उपस्थिती असणार आहे.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील तर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ही परिषद होणार आहे.
या समारंभात एनडीटीव्हीचे सहयोगी संपादक सुशील कुमार माहापात्रा यांना ब्रॉडकॉस्टींग क्षेत्रात द प्रिंटच्या ज्योती यादव यांना डिजिटल आणि डाउन टू अर्थ मुक्त पत्रकार रविलीन कौर यांना प्रिंट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे.
या समारंभासाठी सुप्रसिद्ध पत्रकार प्रा. के. जी. सुरेश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. याशिवाय मीडिया टू मीडिया कनेक्ट’ व यूथ टू यूथ’ असे सत्र होणार आहेत.
”देशातील पत्रकार व पत्रकारितेतील विद्यार्थी वा राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवावा. नोंदणी www.mitwpu.ncmj.com या संकेतस्थळावर करावी”, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रकुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, एनसीएमजेचे निमंत्रक आणि स्कूल ऑफ मीडिया कम्युनिकेशनचे धीरज सिंग व प्रा. डॉ. मिथिला बिनीवाले यांनी दिली.