फुलगाव | भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शाळेची विद्यार्थिनी तन्वी करपट हिने सावित्रीबाईंची वेशभूषा देखील साकारली होती तर गायत्री सावंत हिने मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतीराव फुले यांनी इ.स. १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली.
या कार्यक्रमाचे संयोजन पूनम भोसले, शंकर साळुंखे आणि सोमनाथ आवचर यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.