मुंबई : आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली, हा तर ट्रेलर होता चित्रपट अजून बाकी आहे असं माध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी म्हटलं होतं. भरत गोगावलेंच्या या वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच या प्रकरणात लक्ष घालावं असं ट्वीट केलं आहे.
सुप्रिया सुळे ट्विट मध्ये म्हणतात, गृहमंत्री अमित शाह जी, शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परिसरातच मविआ आमदारांबद्दल हिंसक वक्तव्यं करत आहेत, त्यांना धमकावण्याचं काम करत आहेत, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सत्ताधारी आमदारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं वर्तन केलं आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी तुम्ही तातडीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने चर्चा करावी आणि परिस्थिती लक्षात घेऊन शिंदे गटाच्या आमदारांना लोकशाही मूल्यांची शिकवण द्यावी, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.