देशातील 65 चॅप्टर, जगभरातील 23 देशात अहिंसा रन; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
पुणे | भगवान महावीर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा शांती व अहिंसेचा संदेश समाजापर्यंत पोहचावा यासाठी रविवारी पहाटे पुणेकरांनी रस्त्यावर धाव घेतली. जीतो अपेक्स तर्फे आयोजीत केलेल्या अहिंसा रन मध्ये पुणे चॅप्टरच्या वतीने पुण्यात अहिंसा रनचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुमारे 6 हजार पेक्षा अधिक युवक, महिला आणि आबाल वृद्ध यांचा या दौडमध्ये उत्साहपूर्ण सहभाग होता.
पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावरून ही दौड सुरू झाली. तीन विभागामध्ये ही दौड होती. पहिला टप्पा 10 किमी अंतराचा होता. दुसरा टप्पा 5 किमी आणि तिसरा टप्पा 3 किमी अंतराचा होता. सकाळी सहा वाजता या अहिंसा रनला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आमदार माधुरी मिसाळ व ॲड एस के जैन यांच्या हस्ते झेंडा दाखवून आणि युक्रेनमधून विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणणाऱ्या पायलट शिवानी कालरा, अर्जुन पुरस्कार विजेत्या तेजस्विनी सावंत, एसकेपी कॅम्पस बालेवाडीचे सागर बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अहिंसा रनला सुरुवात झाली.
यावेळी जीतो श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला, जीतो लेडीज विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष संगीता ललवाणी, मुख्य सचिव चेतन भंडारी, जीतो ॲपेक्सचे उपाध्यक्ष कांतीलाल ओसवाल, जीतो ॲपेक्स जेएटीएफचे उपाध्यक्ष इंदर जैन, आरओएमचे अध्यक्ष अजित सेठिया, आरओएम जेएटीएफचे अध्यक्ष इंदर छाजेड, विजयकांत कोठारी, जीतो पुणेचे उपाध्यक्ष मनोज छाजेड, नरेंद्र छाजेड, सुदर्शन बाफना, जीतो ॲपेक्स चे संचालक अचल जैन, धीरज छाजेड, जीतो पुणे लेडीज विंगच्या अध्यक्ष लकीशा मर्लेचा, मुख्य सचिव मोना लोढा, युथ विंगचे अध्यक्ष निकुंज ओसवाल, मुख्य सचिव सिद्धार्थ गुंदेचा, सचिव दिनेश ओसवाल, खजिनदार किशोर ओसवाल, दिलीप जैन, संजय डागा, आरओएम झोन रोमचे पंकज कर्नावट व आदेश खिंवसरा, समन्वयक वैशाली छाजेड, जीफचे सचिव सुजीत भटेवरा, दीपक जैन, अमोल कुचेरिया, आकाश ओसवाल, प्रीत व रुपेश सोलंकी सोलंकी, वर्धमान पुंगलिया, अमित भटेवरा, सिद्धांत छाजेड व यूथ बोर्ड टीम आणि जीतो पुणे चॅप्टर बोर्डचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या अहिंसा रनमध्ये सहभागी होण्यासाठी जीतो पुणेतर्फे नावनोंदणी करण्यात आली होती. सहभागी झालेल्यांना टी शर्ट देण्यात आले होते. अहिंसा रनमध्ये धावणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली होती. त्यासाठी चौकाचौकात स्वयंसेवकांची टीम तैनात केली होती. पाण्याची, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. या अहिंसा रनचे नियोजन रन बडीने केले होते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
“भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अहिंसा रन मध्ये हजारो पुणेकरांनी सहभाग घेतला. पुण्यासह देशातील 65 आणि जगभरातील इतर 23 देशांत ही अहिंसा रन आज एकाच दिवशी झाली आहे. यामध्ये दीड लाखाहून अधिक लोक धावले. भगवान महावीर व महात्मा गांधी यांचा शांती व अहिंसेचा संदेश घेऊन धावलेल्या या अहिंसा रनची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.” – विजय भंडारी (राष्ट्रीय उपाध्यक्ष)
रेकॉर्ड मध्ये पुणे अग्रेसर
“पुणे ऐतिहासिक शहर आहे. पुण्याने कायमच पुढे राहुन सहभाग घेतला आहे. पुणे तिथे काय उणे ही म्हण सार्थ ठरविणारी आजची अहिंसा रन झाली. हजारो पुणेकरांनी आज यामध्ये धाव घेतली. जगाला अहिंसा व शांती या भगवान महावीर व महात्मा गांधी यांनी दिलेल्या विचारांची खूप गरज आहे. त्यामुळेच देशातील 65 चॅप्टरने व जगातील 23 देशात आयोजित केलेल्या अहिंसा रन मध्ये आज लोक धावले. आजच्या या अहिंसा रनचा वर्ल्ड रेकॉर्ड बनण्यात पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे याचा मला विशेष आनंद आहे.” – राजेश सांकला (अध्यक्ष, जीतो पुणे चॅप्टर)
छोटा विचार होता पण जागतिक पातळीवर गेला
“वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचावेत म्हणून अहिंसा रन आयोजित करावी म्हणून विचार मनात आला. तो आमच्या सहकाऱ्यांशी बोलून दाखविला. आणि आज अक्षरशः देशातील 65 आणि जगभरातील 23 देशात अहिंसा रन निमित्त लोक धावले आहेत. याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. ही खूपच आनंदाची बाब आहे. जगाला महावीरांच्या विचारांची आज खरोखरच गरज आहे. आणि या रनमधून महावीरांचे विचार पोहचतील.” – संगीता ललवाणी (राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो लेडीज विंग)