- ‘हुप-इट-अप’ २०२२ चे अहमदनगर कॉलेज, एमआयटी डब्ल्यूपीयू आणि एपीएस विजेते
पुणे | राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) तर्फे पार पडलेल्या ९व्या राज्यस्तरीयआंतर महाविद्यालयीन सिनियर व ज्यूनियर बास्केटबॉल स्पर्धा ‘हुप-इट-अप’ २०२२ मध्ये पुरूष सिनियर गटात अहमदनगर कॉलेज (रोख १५ हजार रूपये), महिला गटात एमआयटी डब्ल्यूपीयू (रोख १० हजार रूपये), ज्यूनियर पुरूष गटात एमआयटी डब्ल्यूपीयू (रोख १० हजार रूपये) व महिला गटात एपीएस (रोख ८ हजार रूपये) या टीम विजेत्या झाल्यात.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या बॉस्केटबॉल मैदानावार पार पडलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत ७८ संघ सहभागी झाले होते. रायगड जिल्हाचे क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, स्पोर्टस विभागाचे संचालक डॉ. पी.जी.धनवे, क्रीडा समन्वयक विलास कथुरे आणि डॉ.मृदुला कुलकर्णी उपस्थित होते.
या स्पर्धेत सिनियर पुरूष गटात सर्वोत्तम खेळाडू वरूण जैन (एसीए), सिनियर महिला गटात संजना जाधव (एमआयटी डब्ल्यूपीयू), ज्यूनियर पुरूष गटात आर्यन थोरात (एपीएस) आणि ज्यूनियर महिला गटात रिषीदा (केएसएससी) हे ठरले आहेत.
त्याच प्रमाणे रनर अप पुरूष सिनियर गटात एमआयटी डब्ल्यूपीयू (रोख १० हजार रूपये), महिला गटात बीएमसीसी (रोख ७ हजार रूपये), ज्यूनियर पुरूष गटात एमआयटी पॉलिटेक्निक (रोख ७ हजार रूपये) व महिला गटात द कल्याणी स्कूल (रोख ५ हजार रूपये) या टीम विजयी झाल्यात. तसेच सर्व विजयी संघांना ट्रॉफी, प्र्रमाणपत्र आणि रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.
क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे म्हणाले ,“ शासनातर्फे राजाश्रय मिळाल्याने वर्तमानकाळात खेळाला चांगले दिवस आले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरकारी कोट्यात थेट उच्च पदस्थ नोकरी मिळते. १० हजारापेक्षा अधिक खेळाडूं सरकारी नोकरीत रूज झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाला प्राधान्य दयावे.”
तसेच राष्ट्रीय क्रीडादिना निमित्त एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कर्मचार्यांसाठी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी विभिन्न गटांमध्ये आयोजित विजेतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.