फुलगाव | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव येथे संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष व गणेशोत्सवानिमित्त संगीत खुर्ची , चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धांचे आयोजन केले होते.
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचं, समाधानाचं आणि संपन्नतेचे वातावरण. विद्येची व बुद्धीची देवता म्हणून श्री गणरायाचे महात्म्य आहे. त्याअनुषंगानेच फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुलात गणेशोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक आकर्षक रांगोळ्या काढल्या. सुंदर चित्रे रेखाटली तर, संगीत खुर्चीच्या खेळाचाही आनंद लुटला.
या स्पर्धांमध्ये संपूर्ण हवेली तालुक्यातील विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे आयोजन उत्तम केल्याने विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. हा कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी व वैशाली क्षीरसागर यांनी स्पर्धांचे मूल्यांकन केले. या कार्यक्रमाचे संयोजन कला शिक्षक शंकर साळुंखे, पांडुरंग जगताप, शैलेश घोंगडे, शेख, कणसे, रेखा खरात, शिवले यांनी केले.