अध्यक्षपदी लायन गोपालकृष्ण अग्रवाल, सचिवपदी लायन जिनेंद्र लोढा व खजिनदारपदी लायन सीए जितेश अग्रवाल यांची निवड
पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड चा शपथग्रहण समारंभ शहरातील कोरियंथन क्लब मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लायन गोपालकृष्ण अग्रवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून तर, लायन जिनेंद्र लोढा यांनी सचिव व लायन सीए जितेश अग्रवाल यांनी खजिनदार म्हणून शपथ घेतली. इंदोरच्या माजी प्रांतपाल लायन रश्मी गुप्ता यांनी नूतन अध्यक्ष आणि संचालक मंडळास पदग्रहणाची शपथ दिली.
आजच्या शपथग्रहण समारंभाच्या दिवशी नवीन २५ जोडप्यांना लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या सदस्यत्व प्रदान करण्यात आले. या नवीन सदस्यांना मुंबईचे उपप्रांतपाल लायन विकास सराफ यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन प्रेमचंद बाफना व लायन द्वारका जालान, माजी प्रांतपाल लायन विजय भंडारी व लायन रमेश शहा, लायन श्याम खंडेलवाल, लायन दिलबागसिंह बीर, लायन भारती भंडारी, लायन रवी खस्तुले आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी प्रांतपाल लायन विजय भंडारी म्हणाले की, लायन्स क्लब ही समाजसेवा करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेत काम करणाऱ्यांना सामाजिक कार्याला वाव मिळतो. सध्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात लायन्स क्लबचे विशेष उल्लेखनीय काम सुरू असल्याचे सांगून लायन भंडारी यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी जमा केलेल्या ५० लाख रुपयांची क्लबच्या वतीने स्वीकृती केली.
नवनिर्वाचित अध्यक्ष लायन गोपालकृष्ण अग्रवाल म्हणाले की, येणाऱ्या काळात डायलिसिस सेंटर, १२०० हेल्मेट व १० सिलाई मशीनचं वितरण आणि ५८ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहे.
मागच्या वर्षाचे अध्यक्ष शैलेश खंडेलवाल, सचिव हेमंत बाफना व कोषाध्यक्ष प्रेमनाथ श्रीनामे यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा अहवाल यावेळी सादर केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन ज्योतीकुमार अग्रवाल, लायन दीपक लोया, लायन विनिता लोहिया, लायन संतोष माळवदे यांनी केले.