जळगाव | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राणा दांपत्य अनेक कारणांमुळें चर्चेत असते. गणेशोत्सवनिमित्त जळगाव शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले. यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
हनुमानाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, अशा शब्दात नवनीत राणांनी हल्लाबोल चढवला. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही उद्धव ठाकरे असाल, तर मी पण राणा आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच व त्यात कळेल की कोण किती मजबूत आहे, अशा शब्दात नवनीत राणांनी ठाकरेंवर बोचरी टिका केली आहे.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी पॉवरचा दुरुपयोग केला, त्यांनी म्हटलं जेलमधून निघाल्यावर महिला तुटून जाईल, तिला काही बोलता येणार नाही, ती आमच्याविषयी काही बोलणार नाही, पण ज्या दिवशी जेलमधून बाहेर पडले, तेव्हा डबल ताकद. चौदा दिवस, बारा-बारा तास जेलमध्ये मी हनुमान चालिसेचं पठण केलंय, उद्धव ठाकरेला प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट… हनुमान चालिसेमध्ये मी पाठ करत होते, जर माझ्या भक्तीत थोडीही ताकद असेल, तर हनुमंत राय त्यांना जागा दाखवेल, आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही,
मै महिला हू, कमजोर नही हू, लढ सकती हू, आगे भी लढूंगी, मै भी मुंबई की लडकी हू और विदर्भ की बहू हू, इतनी कमजोर नही, अगर तू शिवसेना वाला है, अगर तू ठाकरे है, उद्धव ठाकरे है, तो मै भी राणा हू, विदर्भ की बहू समझ कर, तुम्हारे मे कितनी ताकद और मुझ मे कितनी ताकद, अभी आमना सामना तो हो ही जायेगा, असंही राणा म्हणाल्या.विरोधकांना कुठलंही काम उरलं नाही, त्यांना आधीही काम नव्हतं, आता अमित शाह मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळे मुंबईचं काही ना काही तरी चांगलं होईल, असे मत नवनीत राणांनी मांडले आहे. मुंबई महापालिकेत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पिढीचं भलं केलं असं म्हणत नवनीत राणा यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी लोकांच्या हिताचं सरकार मुंबई महापालिकेत आलं पाहिजे, आणि त्यासाठी जोमाने लढणार असल्याचेही राणा म्हणाल्या. जे दोन पिढ्यांपासून मुंबईला खाण्याचं काम करताहेत, त्या उद्धव ठाकरेंचा यावेळी सर्वनाश होणार असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.