मुंबई | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी ॲक्शन मोडमध्ये दिसतात. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यापासून शिंदे राज्यभरात दौरा करताना दिसले. लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढताना दिसले आहेत. ते नेहमी अडीअडचणींमध्ये मदतीला धावतात. अशीच घटना पुन्हा एकदा विलेपार्ले मध्ये बघायला मिळाली.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका कारने अचानक पेट घेतला. मुख्यमंत्री शिंदे हे आपला औरंगाबाद दौऱ्यावरून मुंबईत परतले होते. यानंतर ते येथील विमानतळावरून आपल्या घरी जात होते. ते देखील यांच रस्त्यावरून जात असताना ही घटना पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवला आणि संबंधित कारचालकाच्या मदतीला धावून आले. त्या तरुणाची आपुलकीने विचारपूस केली.
घटनेच्या ठिकाणी घडली पाऊसही सुरू होता. शिंदे भरपावसात गाडीतून खाली उतरले. त्यांनी संबंधित तरुणाला त्याचे नाव विचारले आणि यानंतर त्या तरुणाला धीर देत, जीव वाचला हे महत्त्वाचे, गाडी आपण नवी घेऊ. काळजी करू नकोस, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री म्हणाले. एवढेच नाही, तर पुन्हा गाडीत बसताना, संबंधित तरुणाला जळत्या गाडीजवळ न जाण्याचा सल्लाही दिला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पावसात कार जळताना दिसत आहे.