पुणे | पुण्यातील लोकांच्या खोचक टिकांवरून नेहमी हस्यकल्लोळ होत असतो. असाच काहीसा प्रकार पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मेसेज वरून झाला आहे. हटके स्टाईलच्या शुभेच्छांमुळे हा मेसेज चर्चेत आला आहे. साहेबांच्या बदलीनंतर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या हटके स्टाईलच्या शुभेच्छांची सध्या शहभर जोरदार चर्चा रंगली आहे.
पुण्यातील खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यानंतर खडक पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हॉट्सअपवर हटके स्टाईल आनंद व्यक्त केला आहे. तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते. परंतु, इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते, असे म्हणत या कर्मचाऱ्याने आनंद व्यक्त केला आहे.

या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने लिहले आहे की, “साहेब मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतच नाही, तुम्ही बदलून गेलात फार आनंद झाला याचं पण उत्तर लगेच देतो. एक तर आपण कोणालाच रजा सुट्ट्या देत नव्हते मी सरळ आणि प्रामाणिक काम करणारा साधा कर्मचारी होतो. पण आपली एकच भूमिका खडक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना अथवा अंमलदारांना तुमचा स्वभाव आवडला नाही.””तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते परंतु इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते. त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील. आम्हाला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास दिला त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल. कारण तुम्ही आम्हाला दिलेला त्रास आम्हाला झाला नसून, आमच्या बायका मुलांना झाला आहे. तरीपण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब. असा मजकूर या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये आहे. त्यानंतर आता या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.