एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असताना, दुसरीकडे आता सीएनजीच्या (CNG) दरातही वाढ होत आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही (Nashik) सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर ४ रुपयांनी वाढले. त्यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ९६.५० रुपयांवर पोहचला आहे.
नाशिकमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीएनजीचे दर प्रति किलो ७१ रुपये एवढे होते, मे महिन्याच्या अखेरीस १० रुपयांनी तर जून महिन्यात ४ रुपयांनी वाढ झाली होती,आता आता पुन्हा चार रुपयांना वाढ झाल्याने हे भाव ९६ रुपये प्रति किलो पर्यंत जाऊन पोहोचले.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारणं आहे.
सणासुदीच्या काळात पुण्यातील (Pune) वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण, पुण्यात सीएनजीच्या (CNG) दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ही वाढ करण्यात आली असून या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने हा निर्णय घेतला आहे.