मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी केली जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. त्यानंतर आता दादर येथील रहिवासी गौरी भिडे यांनी ही याचिका केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावे, अशी याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. असा दावाही त्यांनी याचिकेत केल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.