मुंबई | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, शिंदे गटाच्या आमदाराने मनसे अध्यक्षांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे नेते वेगळे झाले आहेत. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सातत्याने एकमेकांवर टीका केली जात आहे. ठाकरे गटाची कोंडी करण्याची एक संधीही शिंदे गटाकडून सोडली जात नाही. त्यातच भाजपने राज ठाकरे यांच्या पत्रानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने एकच चर्चा सुरु झाल्या आहेत.