मुंबई | बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ‘संजय बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत’.
संजय बांगर हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात होते. त्यावेळी गेटवर त्यांना पोलिस कर्मचाऱ्याने अडवले. तेव्हा पोलिस कर्मचारी आणि बांगर यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यावेळी बांगर यांनी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, त्यात अंबादास दानवे यांनी म्हटले की, ‘संजय बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत’.
दरम्यान, बांगर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर दानवे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिल्याचा वृत्त खोडून काढले. मला मुख्यमंत्र्यांनी कोणतीही समज दिलेली नसून, त्या सर्व बातम्या चुकीच्या होत्या, असं प्रत्युत्तर बांगर यांनी दिले आहे.