मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार सत्तेत आले. शिंदे गटाने ठाकरे गटातील अनेक आमदार, खासदार फोडले आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी मोठं विधान केले आहे. ‘ठाकरे गटातील आमदार, खासदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत’, असे ते म्हणाले.
ठाकरे गटातील अनेक आमदार, खासदार शिंदे गटाने आपल्याकडे खेचून घेतले. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव यांचाही समावेश आहे. त्यांनी आता ठाकरे गटातील आमदार, खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ”ठाकरे गटातील खासदार आणि आमदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांच्या स्थानिक पातळीवरील काही वैयक्तिक अडचणी आहेत. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ठाकरे गटात थांबले नाहीत. तर त्यांच्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचे व्यक्तिगत प्रश्न असल्याने ते तिकडे थांबले आहेत”.
दरम्यान, ठाकरे गटातील उर्वरीत 15 आमदारांपैकी 8 आमदार शिंदे गटात येतील. तर पाचपैकी तीन खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील, असे त्यांनी म्हटले आहे.