मुंबई | दृश्यम सिनेमाच्या यशानंतर त्याचा रिमेक अर्थात दृश्यम 2 सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेता अजय देवगन, अक्षय खन्ना, अभिनेत्री तब्बू, श्रीया सरन, इशिता दत्तास, मृणाल जाधव यांची भूमिका आहे. तर हा सिनेमा अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केला आहे. अभिषेक यांनी या सिनेमाविषयीचा एक किस्सा सांगितला आहे.
अभिषेक यांनी सांगितले की, ‘दृश्यम 2’ हा सिनेमा ‘मल्याळम दृश्यम 2’ चा ऑफिशिअल रिमेक आहे. पण आम्ही अनेक सीन्समध्ये हिंदी ऑडियन्सवर लक्ष केंद्रीत करत सीनमध्ये बदल केला आहे. शुटिंगदरम्यान अनेक रात्र जागून डायलॉग रि-राईट केले होते. सिनेमातील शेवटचा सीन ज्यामध्ये गाडीमधून कुटुंब जाते, त्यामागे वेगळाच किस्सा आहे. मल्याळम सिनेमानुसार, शेवटच्या शूटमध्ये अभिनेता कुटुंबाजवळ येतो. पण जेव्हा आम्ही हा सीन शूट केला, तेव्हा ते पाहून मला चांगलं वाटलं नाही.
हे पाहून मी हे शुटिंग लगेच कॅन्सल केले. अजय देवगन माझ्याकडे आले. त्यांनी मला काय झालं असं विचारलं. तेव्हा मी त्यांना मला एक दिवस हवा आहे, असे सांगितले. तेव्हा आम्ही सर्व टीमला घरी पाठवले.