मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बेळगावात सीमाप्रश्नावरून 30 मार्च 2018 प्रक्षोभक भाषण केले होते. त्यांना याप्रकरणी न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. ”समन्स देऊन आपल्याला बेळगावात बोलावून मारण्याचा कट आहे”, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यावर वादंग निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळींनी यावर आपली मते व्यक्त केली आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेत आहे. त्यातच संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे.
त्यावर संजय राऊत म्हणाले, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. राज्य सरकारमधील काही जणांचाही याला छुपा पाठिंबा आहे. समन्स देऊन आपल्याला बेळगावात बोलावून मारण्याचा कट आहे.