उस्मानाबाद | शिवसेना पक्षात फूट पडली आणि ठाकरे गट (Thackeray Group), शिंदे गट (Shinde Group) वेगळे झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार त्यांच्यासोबत गेले आहेत. आता उस्मानाबाद येथील शिवसेना पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे.
ठाकरे गटातून नेते, पदाधिकाऱ्यांची गळती काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यात आता उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेना सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खोचरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. अनिल खोचरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने याचा जिल्ह्यात शिंदे गटाला फायदा होईल, असे म्हटले जात आहे.
माजी आमदाराचाही प्रवेश
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी कालच शिंदे गटात प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेगडे यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता खोचरे यांनी प्रवेश केला आहे.