नवी दिल्ली : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याने वातावरण बिघत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संसदेत बोलत असताना त्यांचा माईक बंद करण्यात आला. यामुळे डॉ. कोल्हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर डॉ. कोल्हे संसदेत बोलत होते. ते म्हणाले, ‘संसदेतील माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही. तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही. आज संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना माईक मध्येच बंद करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मी करत होतो.
दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांनी माईक बंद केल्याचा म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत त्यांच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला.