मुंबई | राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फुले, आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले. ”उच्च शिक्षणमंत्र्यांवर शाई फेकली. जो काही प्रकार झाला त्याचं समर्थन मी करणार नाही. हे योग्य नाही”, असे पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर विधान केले. ते म्हणाले, ”उच्च शिक्षणमंत्र्यांवर शाई फेकली. जे काही प्रकार झाले त्याचं समर्थन मी करणार नाही. हे योग्य नाही. विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार त्यांचा जसा आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आपलाही आहे. मात्र, टीका करणे याचा अर्थ कुणाच्या अंगावर शाई फेकणे असा होत नाही. त्याचं समर्थन आपण कधी करणार नाही”.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नेमकं केलं काय याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी जे विधान केलं ते केलं नसतं तर कदाचित हा प्रकार घडला नसता, असेही शरद पवार म्हणाले.