मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिल्याची माहिती देण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार यांना अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. त्यावेळी ही धमकी देण्यात आली. यामध्ये देशी कट्ट्याने जीवे ठार मारण्याचे म्हटले आहे. सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या पोलिसांच्या फोन ऑपरेटरने ग्रामदेवी पोलिसांकडे यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शरद पवार यांना फोनवरून अशाप्रकारे धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीची पावले उचलून तपास सुरु केला आहे.