मुंबई | शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी घेण्यात येणाऱ्या सीईटी (CET) परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झालं आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच कला, कृषी, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण या विभागाच्या या परीक्षांच हे तात्पुरतं वेळापत्रक असणार आहे.
या वेळापत्रकानुसार, यंदा १८ मार्च ते २३ जुलै या कालावधीत ‘सीईटी’ परीक्षा होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा ९ ते २० मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे.
हि सीईटी परीक्षा अभियांत्रिकी, कृषी, बी.फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असणार आहे. या परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा ९ ते १३ मे दरम्यान होईल, तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ ते २० मे दरम्यान होणार आहे. आणि विधी अभ्यासक्रमामध्ये एलएलबीसाठी १ एप्रिलला, तर एलएलबी यासाठी २ आणि ३ मे रोजी परीक्षा होणार आहे.
दरम्यान, तात्पुरत्या वेळापत्रकानुसार या सर्व परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होण्याचा अंदाज आहे.