मुंबई | ”शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोकं बाहेर पडत आहेत. ही लोकं उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडत आहेत. त्यांच्या सरकारला कंटाळून बाहेर पडले”, असे विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
राज्यात शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झाले. त्यात ठाकरे गटातील अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. अगदी स्थानिक पातळीवरील पदाधिकारीही पक्ष सोडून जात आहे. त्यावर महाजन यांनी विधान केले. ते म्हणाले, ”शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोकं बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरेंना कंटाळून ही लोकं बाहेर पडत आहेत. त्यांच्या सरकारला कंटाळून बाहेर पडले. मात्र, हे लोक आले, एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले”.
मधेच मिशन फेल झालं तर…
एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी अनेकांचे आशीर्वाद होते. आम्हाला वाटलं होतं की, काही खरं नाही मधेच हे मिशन फेल झालं तर कसं काय होईल? 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं. पण ते सोपं वाटत नव्हतं कारण पुढारी कसे असतात, तुम्हाला माहीत आहे. मात्र, सगळे आमच्या पाठिशी उभे राहिले, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.