मुंबई | येणाऱ्या काळात राज्यात विविध महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांच्या विजयाबाबत एक मोठे विधान केले आहे. निवडणूक कुठलीही असो योग्य नियोजन असणे फार महत्त्वाचे आहे. निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे.
आम्ही ज्या कार्यक्रमाला जातो तिथे मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. सहा महिन्यांपूर्वीच आम्ही सत्तेत आलो. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. अतिवृष्टीच्या काळात देखील आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई दिली. हे केवळ सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार असल्यामुळे शक्य झाले आहे असा खोचक टोला देखील शिंदेंनी विरोधकांना लगावला.
त्याचबरोबर, आमच्या सरकारने निकषांमध्ये न बसणारेही निर्णय घेतले आहे. यामागे सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हिच भूमिका होती. लोकांच्या मनात पूर्ण विश्वास निर्माण झाला आहे की, हे सरकार काम करणारं आणि न्याय देणारं सरकार आहे.