पुणे | लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आज लायन्स क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन प्रेमचंद बाफना यांच्या हस्ते व लायन मनोज छाजेड यांच्या उपस्थितीत झाले. लायन विजय भंडारी यांची लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ च्या प्रांतपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हे नवीन कार्यालय गुलटेकडी मार्केटयार्ड येथे गंगाधम चौक रस्त्यावर सुरु करण्यात आले आहे.
लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ च्या क्लबची संख्या शंभराहून अधिक आहे. सामाजिक क्षेत्रातील लायन्स क्लबचे योगदान अनन्यसाधारण आहे. यापुढील काळात सामाजिक क्षेत्रात अधिक भरीव काम करता यावे आणि त्यासाठीचे नियोजन भक्कमपणे करता यावे यासाठी लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे नूतन कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि दहा दिवसांतच तो अंमलात आणला. यासाठी लायन मनोज छाजेड, मुकेश छाजेड, लायन जिनेंद्र लोढा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी लायन द्वारका जालान, लायन श्याम खंडेलवाल, लायन अशोक मिस्त्री, लायन राजेंद्र गोयल, सामाजिक कार्यकर्ते विजयकांत कोठारी, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष लायन महेंद्र गादिया, जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कांतिलाल ओस्तवाल, जीतो रोम चे अध्यक्ष अजित सेटिया, जीतो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ लकीशा मर्लेचा, मुख्य सचिव मोना लोढा, लायन मंगेश कटारिया, ललित जैन, सामाजिक कार्यकर्ते डॉ सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रातील कामाचा व्याप वाढत चालला आहे. त्यामुळे लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ चे प्रशस्त कार्यालय असावे आणि त्याठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरु करावे, अशी सूचना करून लायन प्रेमचंद बाफना यांनी नूतन कार्यालयास शुभेच्छा दिल्या.
लायन द्वारका जालान व राजेश सांकला यांनीही नूतन कार्यालयास यावेळी शुभेच्छा दिल्या.
QUOTE
लायन्स क्लबला सर्वोच्च शिखरावर नेऊ – लायन विजय भंडारी
सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था, संघटना म्हणून लायन्स क्लबची एक वेगळी ओळख आहे. आजपर्यंत केलेल्या दर्जेदार व लोकोपयोगी कामांमुळे लायन्स क्लबने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ मध्ये शंभराहून अधिक क्लब आहेत. प्रत्येक क्लब चांगलं काम करीत आहे. आणि यापुढच्या काळात हे काम आणखी उत्तम होण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ ला सर्वोच्च शिखरावर नेऊ, असा विश्वास प्रांतपाल लायन्स विजय भंडारी यांनी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.